टिपू सुलतान नव्हे महापुरुषांच्या फोटोंची गरज, माजी खासदार हुसेन दलवाई


टिपू सुलतान कर्नाटकचा आहे. त्यामुळे राज्यात त्याच्या नव्हे तर महापुरुषांच्या फोटो व विचारांची गरज असल्याचे वक्तव्य माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केले. तसेच काही मुस्लिम संघटना भाजपच्या साथी असून त्या हे सारे जाणुनबुजून घडवत असल्याचा आरोपही दलवाई यांनी यावेळी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, भाजपला कायमच हिंदू-मुस्लिम वाद पेटवायचा आहे. त्यामुळे समाजवादी पार्टी, एमआयएमसारख्या अनेक मुस्लीम संघटनांना त्यांनी आपले साथी केले असून त्यांच्या माध्यमातून येथील ऐक्याला तडा जातील असे प्रकार घडवून दंगल माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या जोडीला आता इस्लाम पार्टी येत आहे. मुळातच त्यामुळे त्यांच्या टिपू सुलतान हा कर्नाटकचा आहे. मालेगावच्या उपमहापौरानी दालनात त्याचा फोटो लावण्याची काहीही गरज नाही. उलट छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, मौलाना आझाद अशा महापुरुषांचे फोटो लावण्याची गरज आहे, असे दलवाई म्हणाले.
त्यातही केवळ फोटो लावून चालणार नसून त्यांच्या विचारांप्रमाणे आमचे वागणे असायला हवे. आज काही मुस्लीम संघटना भाजपशी हातमिळवणी करीत असले तरी ते त्यांच्यासह मुस्लिमांसाठी धोक्याचे आहे. त्यामुळे मुसलमानांनी संघटनांच्या नांदी न लागता आपल्याला सुरक्षित असलेल्या पक्षांबरोबर राहिले पाहिजे असा सल्ला दलवाई यांनी दिला. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवाजी महाराजांचा कोठेही अवमान केला नाही. टिपू सुलतानबाबतही सकारात्मक भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे त्याचेही राज्यभरात कोणीही राजकारण करू नये असेही दलवाई म्हणाले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button