क्षत्रिय मराठा कदम परिवाराचे आठवे राज्यस्तरीय वार्षिक कुलसंमेलन यंदा पोलादपूर तालुक्यातील वडघर गावामध्ये……

वार्ताहर- महाराष्ट्रातील कदम घराण्याचे आठवे भव्य राज्यस्तरीय वार्षिक कुलसंमेलन यावर्षी रायगड जिल्ह्य़ातील पोलादपूर मधील वडघर बुद्रुुक याठिकाणी शनिवार 21 फेब्रुवारी आणि रविवार 22 फेब्रुवारी यादिवशी आयोजित करण्यात आले आहे.

प्राचीन कदंब राजवंशाचा इतिहास समाजाला कळावा तसेच राज्यभरातील कदम कुटुंबियांना नोकरी व्यवसायात सहकार्य मिळावे , घराण्यातील नामवंतांचा सन्मान करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून , क्षत्रिय मराठा कदम परिवार या संस्थेने आजतागायत सात राज्यस्तरीय कुलसंमेलनांचे आयोजन केले आहेत. यातील तुळजापूर, गिरवी ( फलटण) , गढीताम्हाणे ( सिंधुदुर्ग) आणि गलांडवाडी ( दौंड )धामदरी ( नांदेड), आंबेचिंचोली( पंढरपूर) , जामगे ( खेड )याठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहेत. यंदाचे आठवे राज्यस्तरीय कुलसंमेलन ऐतिहासिक कांगोरीगडाच्या पायथ्याशी वसलेल्या वडघर बुद्रुुक या गावामध्ये 21व 22 फेब्रुवारी रोजी होणार असून, महाराष्ट्रासह गोवा , मध्यप्रदेश, बडोदा , तेलंगणा आणि इतर राज्यातूनही मान्यवर संमेलनात उपस्थित राहणार आहेत.

व्यवसाय तसेच विविध कारणांमुळे विविध ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कदम घराण्यातील व्यक्ति या कुलसंमेलनानिमित्ताने एकत्र येणार असून , घराण्याचा जाज्वल्य वारसा जपण्याचा मानस या मेळाव्यातून केला जाणार आहे. या कुलसंमेलनाच्या पहिल्या दिवशी 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता कुलदेवता श्रीतुळजाभवानीचा जागर गोंधळ तसेच मागील स्नेहसंमेलनाच्या छायाचित्रांचा स्लाईड शो दाखवला जाणार आहे. तसेच दुसर्‍या दिवशी म्हणजेच रविवार 22 फेब्रुवारी रोजी सकाळी ग्रामदेवता जननी देवी दर्शन, पवित्र कदंब वृक्षाचे पूजन त्यानंतर कदम कुळाचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तसेच पोलादपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योजक, उद्यानपंडित पुरस्कार विजेते रामचंद्र रावजी कदम शेठ यांच्या चरित्रपर लिहिलेल्या ” शून्य ते शिखर ” या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी आखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष प्रा. डाॅ.सतीश कदम , छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध उद्योजक मनोज कदम , कोकण इतिहासपरिषद सदस्य प्रवीणकदम , डाॅ.सदानंद गावडे कदम, मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार कदम आणि मोडीलिपी अभ्यासक सुनील कदम या मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.

कुलसंमेलनाचे उदघाटक माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम उपस्थित राहणार आहेत. तसेच निमंत्रक पोलादपूर तालुका कदम भावकी, मौजे वडघर कदम बंधू फौजदार गणपत कदम , शंकर कदम, दगडू कदम , विठोबा कदम ( वडघर)असून कदम घराण्याच्या राज्यस्तरीय कुलसंमेलनास सर्व कदम बंधूंनी उपस्थित राहण्याचे आवाहन क्षत्रिय मराठा कदम परिवार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमरराजे कदम , सचिव रामजी कदम , मुख्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानदेव उर्फ माऊलीशेठ कदम पाटील,आणि सर्व मुख्य कार्यकारिणी सदस्य यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button