
कोकण मार्गावर धावणार्या पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये सापडली बेवारस बॅग
कोकण मार्गावर धावणार्या पुणे एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये सोमवारी बी-१ डब्यात बेवारस बॅग आढळली. ही बाब रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने सुरक्षित करून पुढील कार्यवाहीसाठी रेल्वे संरक्षण दलाकडे सोपवण्यात आली.
या बॅगेत ४,९३३ रुपये, एक पाकीट, आधारकार्ड, एटीएम आणि क्रेडीट, चाव्या, चार्जर, डेटा केबल, इअरफोन व इतर कागदपत्रे होती. प्रवासात कोणत्याही वस्तू आढळल्यास रेल्वे कर्मचार्यांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com



