भास्कर जाधव यांना फक्त सगळ्यांच्या नकला करता येतात, रामदास कदमांची तुफान फटकेबाजी


जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर खेड तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले असून शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात आक्रमक पवित्रा घेत जोरदार फटकेबाजी केली. खेड तालुका तसेच गुहागर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या धामणंद विभागातील पंधरा गटांमध्ये झालेल्या जाहीर सभेमुळे निवडणूक रणधुमाळीला चांगलाच वेग आला आहे.
या सभांमध्य बोलताना रामदास कदम यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर थेट आणि खोचक टीका केली. भास्कर जाधव यांना फक्त सगळ्यांच्या नकला करणारे नेते आहेत. नकला करून राजकारण करता येत नाही. त्यांनी आधी चांगल्या डॉक्टरकडे उपचार घ्यावत असा घणाघात त्यांनी केला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button