
रत्नागिरीत प्रजासत्ताकदिनी ई-कचरा संकलनाची व्यापक मोहीम; खेडशीमध्ये उद्घाटन
रत्नागिरी : देशात वाढत असलेल्या ई-कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी हातभार लावण्याच्या हेतूने रत्नागिरी शहरात प्रजासत्ताकदिनी ई-यंत्रण ही ई-कचरा संकलनाची व्यापक मोहीम राबवली जाणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता खेडशीतील अनुश्रुती एंटरप्रायझेस येथे या मोहिमेचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन होणार आहे. जिल्हा विज्ञान शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष रवींद्र इनामदार या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शहरातील १३ केंद्रांवर सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत ई-कचरा संकलित केला जाणार आहे.
पुण्यातील पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनतर्फे गेली काही वर्षे राज्यातील अनेक ठिकाणी ई-कचरा संकलनाचा उपक्रम राबवला जातो. रत्नागिरीतही हा उपक्रम राबवण्यासाठी ‘अनबॉक्स युवर डिझायर’चे गौरांग आगाशे यांनी पुढाकार घेतला. रत्नागिरीत यंदा या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. यंदा राज्यातील १९ शहरांमध्ये एकाच दिवशी ही मोहीम राबवली जाणार असून, रत्नागिरीत मांडवीपासून खेडशीपर्यंतच्या १३ केंद्रांवर ई-कचरा संकलित केला जाणार आहे. खेडशीतील श्रीनगर येथील अनुश्रुती एंटरप्रायझेस या केंद्रावर या उपक्रमाचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन होणार आहे. या वेळी खेडशी गावचे सरपंच वसंत बंडबे, ‘पूर्णम इकोव्हिजन’च्या रोहिणी सोनावणे, ‘अनबॉक्स’चे गौरांग आगाशे उपस्थित राहणार आहेत.
ई-कचऱ्याच्या निर्मितीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणेही वेगाने बदलावी लागतात. त्यामुळे ई-कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे. या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्यास हवा, पाणी आणि जमिनीचे प्रदूषण होते. म्हणूनच शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट आणि पुनर्वापर यासाठी ई-कचरा संकलित करणे अत्यावश्यक आहे. सुजाण रत्नागिरीकरांनी गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन पर्यावरणरक्षणाला हातभार लावावा, असे आवाहन आयोजक संस्थांनी केले आहे.
ई-कचऱ्यामध्ये स्वीकारल्या जाणाऱ्या वस्तू : फ्रीज, वॉशिंग मशीन, प्रिंटर, कम्प्युटर, माउस, फॅन्स, लॅपटॉप, मायक्रोवेव्ह, पेनड्राइव्ह, टीव्ही, डिजिटल कॅमेरा, एसी, व्हिडिओ कॅमेरा, सीडी / डीव्हीडी प्लेयर, मोबाइल फोन, होम थिएटर्स, चार्जर्स, हेडफोन्स आणि इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स वर्किंग आणि नॉन वर्किंग आणि डिस्पोझेबल वस्तूंचा समावेश आहे. बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे रिसायकलिंग केले जाणार आहे.
सुरू असलेले, परंतु वापरात नसलेले जुने कम्प्युटर्स किंवा अन्य वस्तूही कोणाला स्वेच्छेने द्यायच्या असल्यास देता येतील. या वस्तूंची आवश्यक दुरुस्ती करून त्या वस्तू ग्रामीण भागातील शाळांना दिल्या जाणार आहेत.
हे स्वीकारले जाणार नाही – फ्लोरोसंट ट्यूबलाइट्स, इनकॅन्डेसन्ट बल्ब, सीएफएल
ई-कचरा संकलन केंद्रांची यादी
अनबॉक्स युवर डिझायर – 8767461499 – नाचणे-साळवी स्टॉप लिंक रोड, रत्नागिरी.
आगाशे फूडकोर्ट – 9209414199
अनुश्रुती एंटरप्रायझेस-पितांबरी शॉपी, श्रीनगर-खेडशी, 9423292162
सावंत रोडलाइन्स – 9423297470 – साळवी स्टॉप.
श्री धन्वंतरी आयुर्वेद – 9665055654 – मारुती मंदिर.
श्री धन्वंतरी एंटरप्रायझेस – 9421079654 – शांतीनगर.
मानस किराणा स्टोअर – 9011662220 – माळनाका.
डिक्सन सप्लायर्स – 9422052613 – जिल्हा परिषद कार्यालयाजवळ.
आर्यक सोल्युशन्स – 9420907533 – रमेशनगर.
हॉटेल सी फॅन्स – 9822290859 – मांडवी.
सुरस स्नॅक्स – 9604214101 – कारवांचीवाडी.
खादाडी कट्टा – 8668201414 – जोशी पाळंद.
रत्नागिरीतील सर्व ठिकाणांची लोकेशन लिंक – https://poornamecovision.org/events/mega-drives/e-yantran-2026/ratnagiri
‘ई-यंत्रण’ ई-कचरा जनजागृती आणि संकलन अभियानांतर्गत सहभागी होणारे स्वयंसेवक असे –
गौरांग आगाशे – 9730310799, चिन्मय भागवत – 8888798845, गुरुप्रसाद जोशी – 9552546468, रत्नाकर जोशी – 9422052613, महेंद्र दांडेकर – 7410104433, शरदचंद्र वझे – 9822978033, हृषीकेश सरपोतदार – 9405338354, नेहा गोखले – 9359863349, अमेय मुळ्ये – 9404330003, भाग्यश्री सुर्वे – 7249822776.




