
भाजपचे सोशल मीडिया प्रदेश सह संयोजक समीर गुरव यांच्या उपस्थितीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मीडियाची बैठक रत्नागिरीत संपन्न
भाजप सोशल मीडिया प्रदेश सह संयोजक समीर गुरव कोकण विभाग स संयोजक अभिजित पेडणेकर व आशिष जोगळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप सोशल मीडिया बैठक भाजप जिल्हा कार्यालयात सम्पन्न झाली.याप्रसंगी युवा मोर्चा शहर अध्यक्ष मंदार मयेकर,सोशल मीडियाचे सर्व तालुका संयोजक,विधानसभा संयोजक,युवा मोर्चा प्रतिनिधी उपस्थित होते.कोकण विभाग प्रमुख अभिजित पेडणेकर यांनी सोशल मीडियावरील प्रचाराच्या प्रमुख मुद्दे,कलम 370,विविध सरकारी योजना,सद्य अर्थव्यवस्था यावर मार्गदर्शन केले.समीर गुरव यांनी सोशल मीडियावरील विविध समाजमाध्यमांचा जसे फेसबुक,ट्विटर,व्हाट्सएप,कंटेंट इ.चा कसा प्रभावीपणे वापर करावा याबाबत मार्गदर्शन केले.आशिष जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले.
www.konkantoday.com