दिल्लीत वंदे मातरम सादरीकरणासाठी गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या  दोघांची निवड


दिल्लीतील कर्तव्यपथावर (राजपथ) प्रजासत्ताक दिनाच्या दिमाखदार सोहळ्यात यावर्षी चिपळूणच्या कलेचा आणि कर्तृत्वाचा गौरव होणार आहे. वंदे मातरम या सादरीकरणासाठी झालेल्या निवड चाचणीतून राज्याचे प्रतिनिधीत्व करणार्‍या या संघात मांडकी-पालवण येथील कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या दिनार संजय नेवरेकर व सुजल शीतल वाडकर या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
महाविद्यालयात चतुर्थ वर्षाचा दिनार तसेच द्वितीय वर्षाचा सुजल या सोहळ्यात सादरीकरण करणार आहेत. या वर्षीही चिपळूचे सागर कुंभार हे महाराष्ट्र टीम मॅनेजर म्हणून दिल्ली येथे काम पाहणार आहेत. या यशाबद्दल उद्योगमंत्री उदय सामंत तसेच खासदार शेखर निकम यांनी विद्यार्थ्यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले. त्यांना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, प्राचार्य डॉ. शमिका चोरगे यांचे मार्गदर्शन लाभले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button