
5 वी, 8 वी शिष्यवृती परीक्षा प्रवेशपत्र संबंधित शाळांच्या लॉगीनवर उपलब्ध
रत्नागिरी, दि.19 ) : दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणाऱ्या इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृती परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र संबंधित शाळांच्या लॉगीनवर उपलब्ध करुन देण्यात आले असून, सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडून प्रवेश पत्र प्राप्त करुन घ्यावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेच्या आयुकत अनुराधा ओक यांनी केले आहे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) ही दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहेत. या परीक्षेचे प्रवेशपत्र मंगळवार दि. 13 जानेवारी पासून संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तरी मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावेत.000




