
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक; शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर
शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती
राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करत, महायुती ५६ पैकी ५६ जागा जिंकेल, असा विश्वास रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.
उमेदवारांची पहिली यादी जाहीर मंत्री उदय सामंत यांनीजाहीर केलेल्या यादीनुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी खालील नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
खेडशी जिल्हा परिषदः सौ. हर्षदा भिकाजी गावडे
मुचरी जिल्हा परिषदः माधवीताई गीते
कसबाः रचनाताई महाडिक
झाडगाव : सौ. श्रद्धा दीपक मोरे
पावसः महेंद्रजी मांडवकर
खालगावः महेश माप
गोळपः नंदकुमार मुरकर
वेळणेश्वरः नेत्रा ठाकूर
पडवे: महेश नाटेकर
हातखंबा पंचायत समितीः विद्याविलास बोमले
देवड पंचायत समितीः नेहा गावणकर
नाणीज पंचायत समिती: डॉ. पद्मजा संजय कांबळे




