संगमेश्‍वर तालुक्यातील तुरळ हरेकरवाडी येथील कडवई नदीपात्रात वृद्धाचा मृतदेह


संगमेश्‍वर तालुक्यातील तुरळ हरेकरवाडी येथील कडवई नदीपात्रात राजीवली शिर्केवाडी येथील बेपत्ता वृद्धाचा मृतदेह आढळून आला आहे. शाहू तुकाराम शिर्के (९५) असे त्यांचे नाव आहे. याबाबत पोलीस पाटील संजय ओकटे यांनी संगमेश्‍वर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार शिर्के हे ३० डिसेंबर रोजी सकाळी ५.३० वा. पासून घरातून बेपत्ता झाले होते. १३ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या दरम्यान तुरळ हरेकरवाडी स्मशानभूमीसमोरील कडवई नदीपात्रात त्यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. याप्रकरणी संगमेश्‍वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून सदर आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button