
राजापूरच्या नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी केली कोदवली नवीन धरणाच्या कामाची पाहणी
रत्नागिरी :- राजापूर नगरपरिषद लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड.सौ. हुस्नबानु खलीफे यांनी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत सुरु असलेल्या कोदवली नवीन धरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी धरणाच्या प्रगतीपथावरील विविध कामांचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला. पाहणी दरम्यान धरणाच्या कामामध्ये उर्वरित राहिलेल्या १७ गेटचे काम, एम-३० काँक्रीटचे काम, सीपीसीसी ट्रीटमेंट, पाईपलाईन टाकण्याचे काम, धरणावर जाण्यासाठी काँक्रीट पोहोच रस्ता, तसेच विद्युतीकरणाच्या कामाची पाहणी करण्यात आली. संबंधित कामांची गुणवत्ता, गती आणि वेळेत पूर्तता होण्याबाबत नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी राजापूर नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक श्री. जितेंद्र जाधव, स्वप्नील पड्यार, दिवाकर खडपे तसेच कंत्राटदार श्री. गदगू जाधव आदी उपस्थित होते. कोदवली नवीन धरण पूर्ण झाल्यानंतर धरणातील पाण्याची साठवण सुरु झाल्यानंतर राजापूर शहराला पाण्याची टंचाई कायमची दुर होणार असल्याची ग्वाही देण्यात आली.




