सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरराजापूरकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा चिरेवाहू ट्रकला धडक बसल्याने मृत्यू


मुंबई-गोवा महामार्गावर सावंतवाडी येथून राजापूरकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराची चिरेवाहू ट्रक मिडल कटवरून टर्न घेत असताना ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार अमान अब्दुलगणी खतीब (22, रा.मधीलवाडी, राजापूर) याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर हुंबरठ तिठ्यानजीक उड्डाणपुलावर बुधवारी सकाळी 11.30 वा. च्या सुमारास घडला.

अमान हा कामानिमित्त राजापूर येथून दुचाकीवरून सावंतवाडी येथे गेला होता. सावंतवाडीतील काम आटपून तो पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाला होता. हुंबरठ तिठा दरम्यान महामार्गावरून सर्व्हिस रोडच्या दिशेने मिडलकटने जात असलेल्या चिरेवाहू ट्रकला दुचाकीस्वार अमान याची मागून धडक बसली. या धडकेत अमान याच्या डोक्याला व अन्य ठिकाणी गंभीर दुखापती झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button