
रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे आज स्वीकारणार पदभार
रत्नागिरी : नगरपालिकेच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या सौ. शिल्पा प्रशांत सुर्वे या आज (२९ डिसेंबर) सकाळी ११ वाजता पदभार स्वीकारणार आहेत. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.
निवडणुकीत शहरातील १६ प्रभागातून ३२ नगरसेवक निवडून आले आहेत. या नगरसेवकांतून उपनगराध्यक्ष पदाची निवड होणार आहे. याशिवाय सर्व विषय समित्यांची स्थापना होऊन सभापतींची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे आता उपनगराध्यक्ष तसेच सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे.




