
गुहागरच्या समुद्रकिनार्यावर निळ्या चमकणार्या लाटांचे पर्यटकांमध्ये आकर्षण…
मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी हजेरी लावली असताना निळ्या रंगाने चमकणार्या लाटांमुळे गुहागर समुद्रकिनारा आता आणखीनच मनमोहक दिसू लागला आहे. गेल्या २ वर्षाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा समुद्रकिनार्यावर जीवदिप्तीचे (बायोल्युमिनेसेन्स) दशर्न झाले आहे. गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी गुरुवारी मध्यरात्री हे विहंगम दृष्य आपल्या मोबाईलच्या कॅमेरामधून टिपले आहे.
ख्रिसमस सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी तसेच २०२५ वर्षाला निरोप देण्यासाठी तालुक्यात २५ डिसेंबरपासून पर्यटकांनी ’हाऊसफुल्ल झाला आहे. यामुळे गुरुवारी आलेल्या शकडो पर्यटकांना इतर तालुक्यात वास्तव्यासाठी जावे लागले यामुळे पुढील काळात तालुकावासियांना पर्यटकांच्या निवासाची अधिकची सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
www.konkantoday.com



