कोकण मार्गावर धावणार्‍या स्पेशल गाड्यांमुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडले


कोकण मार्गावर धावणार्‍या नियमित गाड्यांसह हिवाळी स्पेशल हाऊसफुल्ल धावत असतानाच रेल्वेगाड्यांच्या विस्कळीत वेळापत्रकाचा पर्यटकांना फटका बसत आहे. शुक्रवारी ७ रेल्वेगाड्यांना ’लेटमार्क’ मिळाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
मंगळूर स्पेशलसह सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस ३ तास उशिराने मार्गस्थ झाली. दिद्या-सावंतवाडी एक्स्प्रेस १ तास ५० मिनिटे तर सावंतवाडी-दिवा पॅसेंजरला १ तास ३० मिनिटांचा लेटमार्क मिळाला. बांद्रा-मडगाव १ तास ४० मिनिटे तर निजामुद्दी एर्नाकुलम १ तास उशिराने पोहचली. तिरुवअनंतपूरम-एलटीटी २ तास ४०  मिनिटे तर पोरबंदर-तिरुवअनंतपुरम १ तास विलंबाने धावली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button