
मुंबई-गोवा महामार्गासह ग्रामीण भागात झालेल्या अपघातांमध्ये १८ जण प्राणास मुकले
मुंबई-गोवा महामार्गासह ग्रामीण भागात झालेल्या अपघातांमध्ये’१८ जण प्राणास मुकले. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अपघाती मृत्यूची सर्वाधिक नोंद झाली आहे. या दोन महिन्यात ६ जणांचा अपघाती मृत्यू झाला. वाढते प्राणांतिक अपघात ही बाब यंत्रणांसाठी डोकेदुखी ठरली आहे.
वाहनावरील ताबा सुटून समोरील वाहनांना धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वारांना हकनाक प्राणास मुकावे लागले आहे. फेब्रुवारी दोघे जण तर मार्चमध्येही दोघांचा प्राणांतिक अपघात घडला. एप्रिलमध्ये एकाचा तर मेमध्ये दोघांना प्राणास मुकावे लागले. जूनमध्ये दोन, जुलै एक, ऑगस्ट तीन तर सप्टेंबरमध्ये दोघांचा अपघाती मृत्यू झाला. ऑक्टोबर महिन्यातही दोघांना प्राण गमवावा लागला. यामुळे १८ जणांचे संसार उद्धवस्त झाले.www.konkantoday.com




