
निसर्ग संवर्धन करणार्या धनेश पक्षाच्या प्रजातीला वाचवण्याची जबाबदारी सर्वांचीच -भाऊ काटदरे
निसर्ग संवर्धन करणार्या धनेश पक्षाच्या (ककणेर) प्रजातीला वाचवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. त्यासाठी पक्षीप्रेमींनी चळवळ उभारावी, असे आवाहन पक्षीमित्र व सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी केले.
येथील वन विभागाच्या कम्युनिटी सभागृहात सह्याद्री संकल्प सोसायटी संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या धनेश अर्थात हॉर्नबिल घरटी निरीक्षण, संरक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी संस्थेचे प्रतिक मोरे यांनी धनेश पक्षाच्या जीवनचक्राविषयी अनेक उत्सुकता निर्माण करणारी व आश्चर्यकारक माहिती सांगितली. त्यामध्ये धनेश अर्थात कोकणातील बोलीभाषेतील ककणेर हा पक्षी शेतकर्यांचा खर्या अर्थाने मित्र आहे. पक्षांमध्ये धनेश हा शेतकरी म्हणून ओळखला जातो. निसर्गाचे संवर्धन करून पर्यावरणाचे संतुलन राखण्यात मोठा सहभाग आहे. हा पक्षी कुटुंबवत्सल म्हणून ओळखला जातो. एकदा त्याची मादीशी जोडी जुळली की, त्यांची सोबत आयुष्याच्या शेवटपर्यंत राहते. हा पक्षी प्रामुख्याने झाडांची फळे खाऊन उपजीविका करीत असतो.
www.konkantoday.com




