
दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात जखमी झालेल्या निवखोलातील तरुणाचा उपचाराच्या दरम्याने मृत्यू
रत्नागिरी शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागील रस्त्यावरुन विश्वनगर येथे जाणार्या तरुणाचा ७ ऑक्टोबरला झालेल्या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारानंतर पुन्हा त्याला त्रास जाणवू लागल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नदीप रणजित खेतले (२४) असे मृत तरुणाचे नाव आहे. ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी रत्नदीप हा दुचाकी (एमएच ०८ बीएच २८५०) घेऊन सोबत मित्र रुद्र थुळ (१८, दोघेही रा. निवखोल) यास मागे बसवून घेऊन जात असताना विश्वनगर येथे जात असताना त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला व दुचाकी वीजेच्या खांबाला धडकली. यात रत्नदीपच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथे उपचार सुरु होते २५ डिसेंबरला त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने नातेवाईकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.www.konkantoday.com




