सरस महोत्सव २०२५ : गणपतीपुळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय मदत कक्षास उत्स्फूर्त प्रतिसाद

गणपतीपुळे येथे आयोजित सरस महोत्सव २०२५ दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने उभारण्यात आलेल्या वैद्यकीय मदत कक्षास नागरिकांचा व पर्यटकांचा मोठा प्रतिसाद लाभला. महोत्सवाच्या पाच दिवसांत १०० हून अधिक रुग्णांची तपासणी व आवश्यक उपचार करण्यात आले.
या वैद्यकीय कक्षामध्ये ताप, सर्दी-खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, रक्तदाब व साखर तपासणी, जखमांवरील प्राथमिक उपचार तसेच औषधोपचारांची सोय करण्यात आली होती. महोत्सवस्थळी आलेल्या पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनीही या सेवेचा लाभ घेतला.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सतत उपस्थित राहून सेवा दिल्यामुळे तातडीच्या आरोग्य समस्या वेळेत हाताळता आल्या. सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही उपक्रमशील व्यवस्था उपयुक्त ठरली, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
महोत्सव काळात आरोग्य सुरक्षेची प्रभावी व्यवस्था केल्याबद्दल आयोजक व आरोग्य विभागाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. ही सेवा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ माहेश्वरी सातव यांचे मार्गदर्शना खाली वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल पनकुटे, डॉ सुनीता पवार यांचे माध्यमातून आरोग्य अधिकारी कर्मचारी यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button