टेरव येथे बिबट्याचा वावर, नागरिकांनी सतर्क राहण्याचे सरपंचांचे आवाहन


आवश्यक खबरदारी घेण्याचे सरपंच किशोर कदम यांचे आवाहन चिपळूण तालुक्यातील टेरव परिसरात सध्या बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन टेवचे सरपंच किशोर कदम यांनी केले आहे.
टेरव गाव जंगलालगत असल्याने या परिसरात विविध वन्यप्राण्यांचा वावर नेहमीच आढळतो. अलीकडच्या काळात बिबट्याचा संचार वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत बिबट्या सांबराचा पाठलाग करत असताना अचानक एक दुचाकीस्वार आडवा आल्याने सांबर दुचाकीवर धडकले. या धडकेत दुचाकी घसरून दुचाकीस्वार युवक जखमी झाला होता. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच किशोर कदम यांनी ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, रात्री अपरात्री एकटे घराबाहेर पडू नये, शक्यतो रात्री ८ वाजल्यानंतर बाहेर जाणे टाळावे व स्वतःची काळजी स्वतः घ्यावी. तसेच टेरव ते वेतकोंड आणि टेख ते दत्तवाडी हे निर्जन वस्तीचे रस्ते असल्याने या मार्गावरून ये-जा करताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे काळजी घेणे आवश्यक असून कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभाग व ग्रामपंचायतीला कळवावे, असेही सरपंच कदम यांनी स्पष्ट केले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button