
चिपळूण कळंबस्ते येथील कोयना ग्लास दुकानात चोरी, ७६ हजारांचा माल चोरीला
कळंबस्ते ता. चिपळूण येथील कोयना ग्लास या दुकानात अज्ञात चोरट्याने दुकानाच्या मागील पत्र्याचे नटबोल्ट काढून दुकानात प्रवेश करून दुकानातील ऍल्युमिनियम पट्ट्या, फ्रेम असा ७६ हजारांचा माल चोरून नेला. तसेच दुकानातील काचेच्या शीट तोडून नुकसान केले. याबाबत दुकानाचे मालक पवन संकपाळ यांनी चिपळूण पोलीस स्थानकात चोरीच्याबाबत फिर्याद दाखल केली आहे.
www.konkantoday.com




