भगवतीनगर चे माजी सरपंच कै. निवेंडकर गुरुजी यांची एक जानेवारी रोजी शोकसभा

येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, आदर्श शिक्षक व समाजसेवक कै. निवेंडकर गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बुधवार, दि. १ जानेवारी २०२६ रोजी शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. सदर शोकसभा मौजे भगवतीनगर येथे त्यांच्या राहत्या घरी संपन्न होणार आहे.
कै. निवेंडकर गुरुजी यांनी आपल्या कार्यकाळात शिक्षण, सामाजिक सलोखा व ग्रामविकासासाठी मोलाचे योगदान दिले. शिक्षक म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले, तर सरपंच म्हणून ग्रामपंचायत भगवतीनगरच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांचे साधे जीवन, शिस्तप्रिय स्वभाव व सेवाभावी वृत्ती सर्वांना परिचित होती.
या शोकसभेस ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून कै. निवेंडकर गुरुजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. त्यांच्या निधनाने भगवतीनगरसह परिसरात तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button