
राजापूर दुय्यम निबंधक कार्यालयात खोटी कागदपत्रांच्या आधारे खरेदीखत करून फसवणूक केल्याच्या विरूद्ध पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल…
बेळगाव जिल्ह्यातील कोननोळी येथे राहणारे फिर्यादी उमेश दत्तू पाटील यांची बोगस खरेदी खताच्या द्वारे फसवणूक केल्यावरून आरोपी चवगोंडा पाटील (रा. करवीर, कोल्हापूर), फत्तेसिंग चव्हाण (रा. करवीर, कोल्हापूर), पद्मजा लेंगडे, प्रशांत पाटील व त्याची पत्नी अशा पाच जणांविरूद्ध राजापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी क्र. १ चौगोंडा पाटील याने अतिरिक्त आरोपींशी संगनमत करून बोगस आधार कार्ड व खोट्या सह्या यांच्या सहाय्याने बोगस खरेदी खत करून फिर्यादीची जमीन स्वतःच्या नावावर करून फसवणूक केली. याबाबत पोलिसांकडे आरोपींविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




