चिपळूणमध्ये वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शनाचे आयोजन…


वाशिष्ठी देणारी प्रकल्प आयोजित वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन ५ ते जानेवारी दरम्यान बहादूरशेखनाका येथील स्वातंत्रवीर वि. दा. सावरकर मैदानात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी दिली. सलग तिसर्‍या वर्षी होत असलेल्या कृषी महोत्सवामुळे कोकण कृषीची पंढरी होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला.
कोकणात दुग्ध वसाय यशस्वी होत नाही, अशी नकारात्मक भावना गेल्या अनेक वर्षांपासून रुजलेली आहे. मात्र याला छेद देत अत्याधुनिक दुग्ध प्रकल्पाची उभारणी करून सर्वोत्कृष्ट दर्जेदार उत्पादनांमुळे अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला हा दुग्ध प्रकल्प यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. कोकणातील शेतकर्‍यांसाठी पूरक व्यवसायाचा पर्याय उभा करून त्यांना आर्थिक समृद्धी मिळवून द्यावी, इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, हे स्वप्न उराशी बाळगून पिंपळी खुर्द येथे या दुग्ध प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या नियोजनबद्ध कामामुळे अतिशय कमी कालावधीत अत्याधुनिक प्रकल्प उभा राहिला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button