
गुहागर तालुक्यातील ’बाल भारती’ पब्लिक स्कूलमधील सख्ख्या भावंडांनी इंडिया बूकमध्ये प्रस्थापित केला विक्रम…
गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील बाल भारती पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत शिकणारी लिओनापॅ ट्रिशिया कुरागंटी व पहिलीत शिकणारा तिचा भाऊ रिचर्डव्हिन्सेंट कुरागंटी यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विक्रम प्रस्थापित करत नवा इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे या दोघांनी एशिया बुक ऑ फ रेकॉर्ड्स आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही रेकॉर्ड टायटल व ग्रैंड मास्टर टायटल प्राप्त केले आहे. लिओनापॅट्रिशियाने जगातील सर्व देशांच्या राजधान्यांची नावे व रिचर्डव्हिन्सेंट १ ते ५० पर्यंतच्या संख्यांचे वर्ग सर्वात जलद पाठ करण्याचा विक्रम नोंदवला.
रत्नागिरी गॅस आणि वीज कल्पाच्या निवासी संकुलात राहणारे रामबाबू कुरागंटी गेल इंडियाच्या कोकण एलएनजी प्रकल्पात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची मोठी मुलगी लिओनाप ट्रिशिया कुरागंटी आणि लहान मुलगा रिचर्डव्हिन्सेंट कुरागंटी हे प्रकल्पांतर्गत असलेल्या बाल भारती पब्लिक स्कूलमध्ये शिकतात.
७ वर्षे, १० महिने व १ दिवस वयाच्या लिओनापॅट्रिशिया जगातील सर्व देशांच्या राजधान्यांची नावे सर्वात जलद पाठ करण्याचा विक्रम केला. तिने हा पराक्रम अवघ्या १ मिनिट ३८ सेकंद व ४५ मिनिटे सेकंदांत साध्य केला. वैयक्तिक स्पर्धेत तिने नोंदवलेली वेळ पूर्वीचा विक्रम तोडणारी ठरली आहे. त्यामुळे लिओनापॅट्रिशिया इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सची मानकरी ठरली. तसेच ६ वर्षे, २ महिने आणि १८ दिवस | वयाच्या रिचर्डव्हिन्सेंटने १ ते ५० पर्यंतच्या संख्यांचे वर्ग सर्वात जलद पाठ करण्याचा विक्रम नोंदवला. त्याने हे आव्हान अवघ्या ४८६० सेकंदांत पूर्ण केले.www.konkantoday.com




