निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा 7 जानेवारी रोजी


रत्नागिरी, दि. 26 ):- जिल्हा कोषागार अधिकारी यांनी 7 जानेवारी 2026 रोजी श्री शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद येथे सकाळी 11 ते 1 या वेळेत निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा आयोजित केला आहे. निवृत्तीवेतन धारकांना देण्यात येणारे निवृत्त वेतन व इतर लाभ देण्यासंबंधी चर्चा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतन धारक व त्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी तसेच बँक व्यवस्थापक / प्रतिनिधी यांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button