
अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी ०१ वर्ष वय सवलत मिळण्याची मागणी
अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी ०१ वर्ष वय सवलत मिळण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वय मर्यादा खुला प्रवर्गास ३१ वर्षे आणि राखीव प्रवर्गासाठी ३४ वर्षे आहे.
संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ जाहिरात २९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वय मर्यादा गणना दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. उपरोक्त जाहिरात येण्याससाठी ७ महिने उशिर झाला आहे. त्यातही वयोमर्यादा गणना पुढील तारीख नमूद केली आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी अपात्र ठरत आहेत.
मागील वर्षी संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ जाहिरातीस उशीरा आल्याने आपण शासन निर्णय क्रमांक २०२४/प्र. क्र. ३९/४५५२(सेवा) दिनांक २० डिसेंबर २०२४ नुसार १ वर्ष वय सवलत दिली होती. तसेच आपल्या सरकारने २०२५ मध्ये होणाऱ्या पोलीस शिपाई पदासाठी वय सवलत दिली आहे.
त्या अनुषंगाने अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ पोलीस उपनिरीक्षक पदासाठी १ वर्ष वय सवलत मिळावी किंवा वय मर्यादा गणना कालावधी तरी १ जानेवारी २०२५ गृहीत धरला जावा जेणेकरुन आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल.
याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा अशी मागणी एम. पी. एस. सी. स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी केली आहे




