
महायुतीचं ठरलं,200 जागांवर एकमत, 27 ठिकाणी ‘वेट ॲड वॉच’,बैठकीत काय ठरलं?
- मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपासाठी रंगशारदा येथे भाजप आणि शिवसेनत सुरू असलेली बैठक आता संपली आहे. या बैठकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये 200 जागांवर एकमत झाले आहे, तर 27 जागांवर विरोधकांचे कोणते उमेदवार असणार आहे, त्यानुसार महायुती आपले उमेदवार ठरवणार आहे. त्यामुळे जागावाटप संदर्भातला कोणताही तिढा उरलेला नसल्याचे भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितले.
महायुतीची रंगशारदामधील बैठक पार पडल्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी या बैठकीचा तपशील दिला आहे.227 जागा जागांवर आमचे उमेदवार ठरले आहेत. 200 जागांवर आमचे एकमत झाले आहे.आणि 27 जागांवर देखील आमचे उमेदवार ठरले असून विरोधकांचे त्या 27 जागांवर उमेदवार कोण असणार आहेत, यानंतर आम्ही आमचे उमेदवार ठरवणार असल्याचे भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितले आहे.
जागा वाटप संदर्भातला कोणताही तिढा नाही
शिवसेनेचे राहुल शेवाळे बैठकीनंतर म्हणाले, जागावाटप अंतिम टप्प्यात आहे लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या संदर्भातली घोषणा करतील. जागावाटपावर तिढा वगैरे राहिलेला नाहीये दोन-तीन गोष्टीवर आमची चर्चा झालेली आहे.जागा वाटपाचा निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घोषित करतील तो त्यांचा अधिकार आहे.ज्या जागांचा तिढा होता त्या जागांची चर्चा झाली ही सर्व माहिती आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिली जाणार आणि यासंदर्भात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री सोबत चर्चा करतील उद्या आणि परवा याबाबतची घोषणा केली जाईल
तसेच कुठलाही राजकीय पक्ष अजून पर्यंत कोणत्या आघाडीने किती जागा लढणार ही घोषणा केलेली नाही दोन दिवसापूर्वी उबाठा मनसे यांचे युती झाली पण त्यांनी देखील आपल्या जागा घोषणा केलेली नाही. आम्ही देखील या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवलेले आहेत सगळे जागा घोषित करतील त्यावेळेस आम्ही जागा घोषित करू अगोदरच आपला आकडा सांगू नये हे राजकीय गणित आहे, असेर राहुल शेवाळे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री लवकरच जागावाटप संदर्भात घोषणा करतील.महायुती एक परिवार आहे परिवार म्हणून आम्ही निवडणूक लढवत आहोत 227 जागेत आम्ही परिवार म्हणून कुटुंब म्हणून निवडणूक लढतोय मोठा भाऊ छोटा भाऊ कुठेही नाही. दीडशेपेक्षा जास्त माहितीचे उमेदवार जिंकतील आणि मराठीत महापौर होईल,असा विश्वास राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला




