
आयटीआय रत्नागिरी येथे उपहारगृहासाठी8 जानेवारीपर्यंत निविदा
रत्नागिरी, दि. 26 ):- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाचणे रोड, रत्नागिरी येथे नोंदणीकृत महिला बचत गटामार्फत उपहारगृह कार्यान्वित करण्यासाठी निविदा 8 जानेवारी 2026 पर्यंत मागविण्यात येत आहेत. नोंदणीकृत महिला बचत गटांनी निविदा सादर कराव्यात असे आवाहन प्राचार्य, शशिकांत कोतवडेकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी गट निदेशक चंद्रशेखर राजाराम शिंदे, 9967775317 किंवा वसुधा प्रमोद पांचाळ 9075587606 यांच्याशी संपर्क साधावा.
संस्थेमध्ये 887 प्रशिक्षणार्थी व 57 कर्मचारी कार्यरत आहेत. संस्थेमध्ये उपहारगृह सकाळी 8.15 ते सायंकाळी 4.45 या वेळेत सुरू रहाणार आहे. 29 डिसेंबर ते 8 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत (सार्वजनिक सुट्टी, दुसरा व चौथा शनिवार वगळून) कोऱ्या निविदा मिळतील व स्वीकारण्यात येतील. 8 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत निविदा स्वीकरण्यात येतील व 9 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता निविदा उघडण्यात येतील. कोऱ्या निविदा शुल्क पन्नास रूपये बिनव्याजी परतावा बयाना रक्कम एक हजार रूपये व बिन व्याजी सुरक्षा ठेव दहा हजार रूपये आहे.




