
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे रत्नागिरी जिल्हा पक्षाच्या वतीने लोटे एमआयडीसी लक्ष्मी ऑरगॅनिक्स’ कंपनी विरोधात मा.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

*इटलीतून हद्दपार केलेली केमिकल कंपनी मिटेनी’ (Miteni S.p.A) ही कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड लोटे एमआयडीसी येथील ‘लक्ष्मी ऑरगॅनिक्स’च्या कंपनीमध्ये सुरु करण्यात आली असल्यामुळे या कंपनी विरोधात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रत्नागिरी जिल्हाप्रमुख श्री दत्ताजी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी(सा.प्र.) श्री विश्वजीत गाताडे यांच्याकडे या कंपनीला आमच्या पक्षाचा विरोध असून सदर कंपनी तात्काळ बंद करावी. अन्यथा कंपनीच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरावे लागेल असा निवेदन देवून इशारा देण्यात आला आहे. त्यावेळी उपस्थित चिपळूण तालुकाप्रमुख श्री बळीराम गुजर, उपतालुकाप्रमुख श्री विजय देसाई, सुभाष रहाटे, महिला विधानसभा क्षेत्र संघटक सौ.सायली पवार, मा.नगरसेविका सौ.रशिदा गोदड, मा.सरपंच सौ.अनिषा नागवेकर, नगरसेविका सौ.फौजीया मुजावर, उपशहरप्रमुख श्री नितीन तळेकर, सलील डाफळे, विभागप्रमुख श्री अजित गुजर, श्री नयन साळवी, मयुरेश पाटील, शशिकांत बारगोडे, तनवीर मुजावर, संदेश भिसे, उपविभागप्रमुख श्री सचिन सावंतदेसाई, दिलावर गोदड, शाहनवाज काझी, राजेंद्र सुर्वे, शांताराम गुरव, मा.शाखाप्रमुख श्री विनायक वास्कर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.




