
ना. उदयजी सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळांसह नगरसेवकांची उपस्थिती
चिपळूण : राज्याचे उद्योग मंत्री, मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांचा वाढदिवस रत्नागिरीत उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी यशस्वी उद्योजक प्रकाश देशमुख, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ, नगर परिषदेतील सर्व नगरसेवक व नगरसेविका, उपशहर प्रमुख सुयोग चव्हाण, दयानंद जवळे, संदेश गोरिवले तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून ना. उदयजी सामंत यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी उपस्थितांनी ना. सामंत यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यात उद्योग, रोजगार, पायाभूत सुविधा तसेच सांस्कृतिक आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. चिपळूण शहरासह संपूर्ण कोकणाच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे वातावरण उत्साही असून, सर्वांनी ना. उदयजी सामंत यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



