
’सह्याद्री क्लासिक’ सायकलिंग स्पर्धेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य विनायक पावसकर यांची उल्लेखनीय कामगिरी
सह्याद्रीच्या नयनरम्य पर्वतरांगांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ’सह्याद्री क्लासिक’ सायकलिंग स्पर्धेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य सुपर रॅडोनिअर (एसआर) विनायक विजय पावसकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. ११३ स्पर्धकांमधून तीन गटांमध्ये त्यांनी ५ वा क्रमांक पटकावला.
या कामगिरीमुळे रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि रत्नागिरीचे नाव अधिक उंचावले आहे. मिळालेल्या यशाबाबत बोलताना पावसकर म्हणाले, घाट उंच नसतात, उंच असते आपल्या प्रयत्नांची मर्यादा. हा संपूर्ण प्रवास फक्त पायांनी पॅडल मारण्याचा नसून तो स्वतःला हरवून पुन्हा सापडण्याचा मानसिक प्रवास होता. स्पर्धेतील पहिला टप्पा होता तापोळा घाट, जो २६ किमीचा आणि ७३२ मीटर एलिवेशनचा आव्हानात्मक चढण मार्ग होता. तरीही पहिल्या ग्रुपसोबत राहण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवत जोरदार सायकलिंग केले. हा टप्पा १ तास १८ मिनिटांत पूर्ण करून पाचवे स्थान मिळवले.
www.konkantoday.com




