
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना ‘न्यू इयर’ गिफ्ट! दादर-तिरुनेलवेली एक्स्प्रेसच्या डब्यात वाढ.!
मुंबई : कोकण रेल्वेवर धावणाऱ्या दादर – तिरुनेलवेली एक्स्प्रेसला एक अतिरिक्त डबा कायमस्वरुपी जोडण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होईल. नववर्षानिमित्त रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना ही भेट दिली आहे.
दक्षिण रेल्वेतर्फे चालविण्यात येणाऱ्या गाडी क्रमांक २२६२९ / २२६३० तिरुनेलवेली – दादर – तिरुनेलवेली एक्स्प्रेसला (साप्ताहिक) एक तृतीय वातानुकूलित डबा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वी ही द्वितीय आणि तृतीय वातानुकूलित प्रत्येकी एक-एक डबा, तृतीय इकाॅनाॅमी एक डबा, शयनयान ६ डबे, सामान्य ४ डबे, जनरेटर कार एक डबा, एसएलआर एक डबा अशी १५ एलएचबी डब्यांची रेल्वेगाडी होती. यात आता एक तृतीय वातानुकूलित डबा जोडण्यात आला आहे. उर्वरित सर्व डब्याची संख्या सारखी असेल. त्यामुळे ही रेल्वेगाडी १६ एलएचबी डब्यांची झाली आहे, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली.
दादर – तिरुनेलवेली अतिजलद एक्स्प्रेस ही आठवड्यातून एकदाच धावते. या रेल्वेगाडीची पहिली फेरी मे २०१३ रोजी धावली. ही रेल्वेगाडी देखभालीसाठी कधीकधी रद्द किंवा अंशत: रद्द केली जाते. महाराष्ट्रात या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली येथे थांबे आहेत.
या रेल्वेगाडीच्या डब्यात तात्पुरती वाढ
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी रेल्वेने यशवंतपूर – कारवार विशेष एक्स्प्रेसला तात्पुरत्या स्वरूपात जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०६२६७ यशवंतपूर – कारवार आणि गाडी क्रमांक ०६२६८ कारवार – यशवंतपूर रेल्वेगाडीला द्वितीय वातानुकूलित एक डबा, तृतीय वातानुकूलित ३ डबे, शयनयान १२ डबे, सामान्य ३ डबे, एसएलआर २ डबे असे एकूण २१ डबे असतात.
नववर्षानिमित्त गाडी क्रमांक ०६२६७ यशवंतपूर – कारवार विशेष एक्स्प्रेसला २७ डिसेंबर रोजी आणि गाडी क्रमांक ०६२६८ कारवार – यशवंतपूर विशेष एक्स्प्रेसला २८ डिसेंबर रोजी द्वितीय वातानुकूलित आणि सामान्य असा प्रत्येकी एक जादा डबा जोडला जाईल. त्यामुळे द्वितीय वातानुकूलित दोन डबे आणि सामान्य चार डबे असतील. तर, इतर रेल्वे डब्यांची संख्या तशीच असेल. एकूण २३ डबे या रेल्वेगाडीला असतील,




