
मुंबई-गोवा संगमेश्वर राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा चुकीचा दिशादर्शक फलक लावल्याने वाहनचालकांना होतोय विनाकारण त्रास
मुंबई-गोवा संगमेश्वर राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा चुकीचा विशादर्शक फलक लावण्यात आल्याने वाहनचालकांची दिशाभूल होत असून, विशेषतः खासगी आराम बस चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संगमेश्वर येथील सोनवी पुलाजवळ खालच्या बाजूने मुंबईकडे जाण्यासाठी संबंधित रस्त्याचा वापर करावा, असा दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे. मात्र, या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
रत्नागिरीकडून चिपळूणकडे जाणारा पर्यायी मार्गही खोदण्यात आल्याने एकेरी वाहतूक बंद करण्यात आली आहे. परिणामी चुकीच्या फलकामुळे अनेक खासगी बस चालक अरुंद व खोदाई केलेल्या रस्त्यावरून जाण्यास भाग पडत असून, बस वळवताना मोठी कसरत करावी लागत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत असून, त्यांना उशीर, गैरसायक धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या प्रकारामुळे ठेकेदार कंपनीचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला असून, महामार्ग बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
www.konkantoday.com




