प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांना एआय आधारित शिक्षण उपकरणाचे पेटंट

दापोली : येथील वराडकर बेलोसे महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ व संशोधक डॉ. भारत दगडोबा कऱ्हाड यांना त्यांच्या संशोधनावर आधारित “एआय बेस्ड ऑनलाईन डिजिटल एज्युकेशन डिवाइस” (AI Based Online Digital Education Device) या अभिनव संकल्पनेसाठी भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून अधिकृत डिझाइन पेटंट प्रदान करण्यात आले आहे. ही उपलब्धी शिक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व प्रेरणादायी मानली जात आहे.

हे पेटंट डिझाइन क्रमांक ४६९३४२-००१, सीरियल क्रमांक २१२२५६, नोंदणी दिनांक ११ ऑगस्ट २०२५, श्रेणी १४-०२ अंतर्गत नोंदणीकृत असून ही नोंदणी डिझाइन कायदा २००० आणि डिझाइन नियम २००१ यांच्या तरतुदींनुसार करण्यात आली आहे. या पेटंटमुळे या उपकरणाचा बौद्धिक संपदा अधिकार पुढील दहा वर्षांसाठी सुरक्षित झाला असून आवश्यक कायदेशीर प्रक्रियेनंतर तो पुढील पाच वर्षांसाठी वाढविता येणार आहे.
डॉ. भारत कऱ्हाड हे पीएचडी., एम.कॉम, एमबीए, सीए अशी उच्च शैक्षणिक पात्रता प्राप्त केलेले शिक्षणतज्ज्ञ असून गेली ३० वर्षे ते शिक्षण, संशोधन, प्रशासन आणि समाजसेवा क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत १८ पेक्षा अधिक संदर्भ ग्रंथ आणि २३ संशोधन लेख प्रकाशित केले असून २००३ साली पुणे विद्यापीठाकडून त्यांना ‘बेस्ट एनएसएस ऑफिसर’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
एआय आधारित हे डिजिटल शिक्षण उपकरण विद्यार्थ्यांचे अध्ययन, शिक्षकांचे अध्यापन, मूल्यांकन प्रणाली आणि शिक्षण व्यवस्थापन अधिक आधुनिक, वैयक्तिकृत आणि प्रभावी बनविणारे ठरणार आहे. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी हे उपकरण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
या संशोधन प्रकल्पात डॉ. भारत कऱ्हाड यांच्यासोबत प्रा. डॉ. रीना सिंग, प्रा. डॉ. बी. के. सरकार, प्रा. डॉ. वंदना सिंग आणि परी निधी सिंग यांनी सहकार्य केले आहे.
या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी व विविध सामाजिक संस्थांकडून डॉ. भारत कऱ्हाड यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button