चिपळूण एस. टी. डेपोचे रखडलेले काम लवकरच मार्गी लावणार— परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांचा सदानंद चव्हाण यांना शब्द


*चिपळूण शहरातील गेली पाच ते सहा वर्षे रखडलेले चिपळूण एस. टी. डेपोचे काम आवश्यक तो अतिरिक्त निधी उपलब्ध करून देत लवकरच मार्गी लावण्यात येईल, असा शब्द राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सदानंद चव्हाण यांना दिला आहे.
चिपळूण एस. टी. डेपोच्या इमारतीचे भूमिपूजन होऊन सुमारे पाच ते सहा वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. या दरम्यान ठेकेदार बदलले असले तरी कामाची गती अत्यंत मंद राहिली आहे. या संदर्भात अनेक आंदोलने झाली, मात्र ठोस कार्यवाही न झाल्याने प्रवासी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी थेट परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन डेपोच्या रखडलेल्या कामाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी ना. सरनाईक यांनी आचारसंहिता संपताच या विषयावर विशेष बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधीची गरज भासल्यास त्याचीही व्यवस्था करण्यात येईल आणि कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर चिपळूण एस. टी. डेपोचे काम पूर्ण केले जाईल, असा ठाम शब्द त्यांनी दिला.
या भेटीवेळी माजी बांधकाम सभापती विनोद झगडे, तालुकाप्रमुख संदेशबापू आयरे, उपशहरप्रमुख विकी लवेकर उपस्थित होते.
………………………

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button