
कोतवडे हायस्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात
रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई संचलित श्री. वी. प. कोतवडे इंग्लिश स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव शाळेच्या क्रीडा नगरीमध्ये नुकताच झाला.
प्रारंभी ईशस्तवन व स्वागत पद्य सादर करण्यात आल्या. कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे उपाध्यक्ष संजय मयेकर यांनी क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष नरेश कांबळे,
प्रमुख पाहुणे सुधीर कांबळे, संस्था कार्यकारणी सदस्य प्रकाश ठोंबरे, कोतवडे ग्रुपग्रामपंचायतचे सरपंच संतोष बारगोडे, उपसरपंच स्वप्नील पड्याळ, रत्नागिरी तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष व जिल्हा परिषद गट कोतवडेचे विभागाचे प्रमुख स्वप्नील तथा तारक मयेकर, रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. यादव, कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विजय बेहरे, कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे माजी कार्यकारणी सदस्य किशोर पेडणेकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी, पोलीस पाटील वैष्णवी माने, सौ पवार, कोतवडे तंटामुक्तीचे अध्यक्ष सुनील कांबळे, ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. दिया कांबळे, सौ. पायल पांचाळ, शाळेचे मुख्याध्यापक प्रेमदास पवार, शाळेतील क्रीडा विभाग प्रमुख गुरुदास खुळे, जांभरुण गावचे सरपंच गौतम सावंत, उपसरपंच मंदार थेराडे, पोलीस पाटील त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
श्री. पड्याळ, श्री. मयेकर, शाळेचे मुख्याध्यापक यांनी क्रीडा महोत्सवाला सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे शाळेच्या प्रगतीच्या मनोकामना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. मयेकर यांनी शाळेच्या एकंदरीत जडणघडणीमध्ये ज्या ज्या मान्यवर व्यक्तींचे शासकीय कार्यालयांचे सामाजिक संघटनांचे जे जे योगदान मिळाले त्यांचा नामोल्लेख करून सर्वांना धन्यवाद दिले. विद्यार्थी यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये नैपुण्य प्राप्त करावे, तरच उद्याचा भविष्यकाळ चांगला आहे अशा प्रकारची मनोकामना व्यक्त केली. तसेच विद्यार्थी खेळाडूंनी आपल्या समोरच्या खेळाडूला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये अशा प्रकारच्या भावनेने मैत्रीपूर्ण खेळ खेळावा अशी सदिच्छा व्यक्त केली.
शिवशंभो शिवकालीन आखाड्यामध्ये लहान मुले मुंबईवरून येऊन लोप पावलेली कला पुनर्जीवित करण्याचे काम केले. यावेळी छोट्या मुलांनी दांडपट्टा बनाटी आग गोळे ढाल तलवार लाठीकाठी यांचे प्रात्यक्षिक करून वातावरण क्रीडामय करून टाकले.
रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. यादव यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी किमान एका खेळाची आवड जपावी जेणेकरून आजच्या युगामध्ये जी व्यसनाधीनता वाढलेली आहे, ती कमी करता येईल असे सांगितले. मन सदृढ असेल तिथेच आपल्याला प्रगती करता येते. मैत्रीपूर्ण संबंध जपता येतात यावर त्यांनी भाष्य केले.
कोतवडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांना शिस्तबद्ध संचलन करून मानवंदना दिली व खेळाडू वृत्तीची शपथ घेऊनक्रीडा ज्योत प्रज्वलित करून चैतन्य निर्माण केले व खेळाचे उद्घाटन झाल्याचे मान्यवरांनी जाहीर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक श्री. खुळे यांनी केले. सूत्रसंचालन श्री. कोलगे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख व स्वागत श्री. लिंगायत यांनी करून दिली. आभार प्रदर्शन श्रीमती मोहिते यांनी केले.




