
बेपत्ता व्यक्तींविषयी निवेदन
रत्नागिरी, दि. २४ ) : मोहम्मद आक्रम आन्सारी वय ५२ वर्षे रा. मु.पो. लाखपाळ, तालुका माणगांव, जिल्हा रायगड येथील रहिवासी असून वीर रेल्वे स्टेशन बाहेरील रिक्षा स्टँड येथुन १३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता नापत्ता झाले आहेत. त्याची उंची ५ फुट ५ इंच, रंग – गोरा, अंग – भक्कम, चेहरा – गोल, नाक – सरळ, डोकीचे केस – बारीक, मिशी – बारीक पांढरी, दाढी – पांढरी वाढलेली, नेसणीस ऑफ व्हाईट रंगाचे फुल बाह्याचे शर्ट, गे रंगाची ट्रॅक पॅन्ट, पायात काळ्या रंगाची स्पार्क कंपनीची स्लीपर,डावा कान कानाला खालच्या बाजुस चिकटलेला अशी ओळख खूण आहे. नापत्ता व्यक्तींबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास पोलीस उपनिरीक्षक रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे येथे त्वरित संपर्क साधावा.




