
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला – सावंतवाडी – कुडाळ मुख्य मार्गावरदुचाकी आणि कारचा भीषण अपघातात एकाचा मृत्यू
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला – सावंतवाडी – कुडाळ मुख्य मार्गावर मठ कुडाळतिठा येथे मंगळवारी (दि. २३) दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला.या अपघातात मदन अच्युत मेस्त्री (वय ४२) यांचा मृत्यू झाला. मदन मेस्त्री यांचा भाऊ गुरुनाथ मेस्त्री यांनी वेंगुर्ला पोलीस स्थानकात अपघाताची माहिती दिली. त्यानुसार, वेंगुर्ला पोलिसांकडून नोंद करण्यात आली आहे.
मठ कुडाळतिठा येथील धोकादायक वळणावर हा अपघात घडला. वेंगुर्ल्यातून मठमार्गे डेगवे सावंतवाडी कडे जात असताना, नागेश पांडुरंग दळवी हे कुटुंबासमवेत ओमनी कार (MH 07 Q 4902) ने प्रवास करत होते. या वेळी, कुडाळहून वेंगुर्ला कडे येणाऱ्या मदन मेस्त्रीच्या (MH 07 AQ 2703) दुचाकीला कारने धडक दिली, ज्यामुळे मदन गंभीर जखमी झाले. जखमी युवकाला बाहेर काढले आणि त्याला 108 एंब्युलन्सच्या सहाय्याने वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.




