
रत्नागिरी तालुक्यातील चरवेली दुर्गामातानगर येथून दुचाकीची चोरी अज्ञाताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी तालुक्यातील चरवेली दुर्गामातानगर येथून दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १७ ते १९ डिसेंबर दरम्यान घडली. नामदेव भोसले (३३, रा. चरवेली) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली. नामदेव यांनी आपली दुचाकी (एमएच ०८ एएस ७७६३) घराच्या अंगणात उभी करुन ठेवली होती. वरील काळात चोरट्याने ती चोरुन नेली. अशी नोंद ग्रामीण पोलिसात करण्यात आली आहे. पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com




