
चर्मालय येथील स्मशानभूमीच्या इमारतीवर गवताचे साम्राज्य
रत्नागिरी शहरात अंत्यसंस्कार करण्यासाठीचर्मालय येथे रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने स्मशानभूमी उभारण्यात आली आहे या ठिकाणी नेहमीच्या पद्धतीने म्हणजे लाकडे रचून अंत्यसंस्कार केले जातात तसेच या ठिकाणी डिझेलचा वापर करून डिझेल वाहिनी तर्फे अंत्यसंस्कार करण्याची सुविधा करण्यात आली आहे मात्र सदर स्मशानभूमीच्या इमारतीकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष झाले आहे या इमारतीवर गवत उगवले आहे मात्र हे गवत काढण्याकडे नगर परिषदेचे कोणतेही लक्ष नाही सध्या या इमारतीवर गवत वाढले असून गवताचे थर इमारतीवर दिसत आहेत त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या नागरिकांना या ठिकाणी असुविधाला तोंड द्यावे लागत आहे स्मशानभूमीच्या या इमारतीवरील गवत काढून हा परिसर स्वच्छ करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे




