
रत्नागिरी रेल्वेस्टेशन परिसरात पैसे न दिल्याने सावत्र बापाला दांडक्याने मारहाण
रत्नागिरी रेल्वेस्टेशन परिसरात पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने सावत्र बापाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. गंगाराम गनू घोडेकर (७६, रा. नरसरीवाडी, ता. लांजा) असे मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसानी मारहाण करणार्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अर्जुन भिवा पवार (३८, रा. पानवल होरंबेवाडी) असे संशयिताचे नाव आहे. या गुन्ह्यातील माहितीनुसार, गंगाराम हे रेल्वेस्टेशन परिसरातून आपला उदरनिर्वाह करतात. १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास अर्जुन पवार हा त्या ठिकाणी आला. तसेच सावत्र वडील गंगाराम यांच्याकडे खर्चासाठी पैसे मागू लागला. गंगाराम यांनी अर्जुन याला पैसे देण्यास नकार दिला. याचा राग येवून अर्जुनने लाकडी दांडक्याने मारहाण केली, अशी तक्रार गंगाराम यांनी शहर पोलिसात दाखल केली. अधिक तपास पोलीस करत आहेत.www.konkantoday.com




