चिपळूण नगरपरिषद निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराने चक्क कोणी देणगी मागायला येऊ नये असा भला मोठा बोर्ड लावला


निवडणुकीत सर्वच मतदार आता हुशार झाले असून येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला तुम्हालाच मत देणार असे सांगत असतात मात्र प्रत्यक्षात निकाल लागल्यानंतर मतदारानी आपल्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते त्यामुळे चिपळूण मध्ये नाराज झालेल्या एका उमेदवाराने लावलेल्या एका भल्या मोठ्या बोर्डाची आता सध्या चर्चा सुरू आहे
चिपळूण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आयत्यावेळी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले माजी नगरसेवक सुधीर शिंदे यांचा दणदणीत पराभव झाला. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक अकरामधून निवडणूक लढवलेल्या त्यांच्या पत्नीचाही पराभव झाल्याने शिंदे कुटुंबाला दुहेरी धक्का बसला आहे.

या पराभवाने सुधीर शिंदे चांगलेच नाराज झाले असून त्याची झळ त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही उमटताना दिसत आहे. पराभवाच्या नाराजी मधून त्यांनी आपल्या दुकानाबाहेर थेट ‘कोणीही देणगी मागायला येऊ नये’ असा मजकूर असलेला भला मोठा फलक लावला आहे. हा फलक सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला असून, निवडणुकीनंतरच्या राजकीय आणि मानसिक स्थितीचे ते प्रतीक मानले जात आहे.

नगराध्यक्षपदाची निवडणूक संपल्यानंतर उमेदवारांकडून अशा प्रकारे जाहीर प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे त्यामुळे अनेक वेळा लोक फायद्यासाठी देणग्या वगैरे मागायला येतात हीच लोक आपल्याला मतदान करतील अशी देणगी देणाऱ्याची अपेक्षा असते मात्र प्रत्यक्षात अपेक्षाभंग होतो त्यामुळे शिंदे यांनी लावलेल्या या भला मोठ्या बोर्डाचे सर्वत्र चर्चा सुरू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button