
दापोली समुद्रकिनारी बेशिस्त पर्यटकांच्या स्टंटबाजीला वचक बसणार, मुरुड समुद्रकिनारी वाहनांना बंदी
दापोली समुद्रकिनारी बेशिस्त पर्यटकांच्या वाहनांचे स्टंट करण्याचे प्रकार वाढल्याने तालुक्यातील मुरुड समुद्र किनार्याकडे जाणारा रस्ता अखेर बॅरिकेटस् व दगड लावून बंद करण्यात आला आहे. यामुळे आता फक्त पायीच समुद्र किनार्यावर जाता येणार आहे. यामुळे बेशिस्त पर्यटकांच्या स्टंटबाजीला आळा बसणार असला तरी मुरुडमध्ये कुठेच पार्किंगची व्यवस्था नसल्याने पर्यटकांची संख्या रोडावण्याची भीती व्यक्त होत आहे.
सोमवारी मुरुड समुद्रकिनार्यावर बेशिस्त पर्यटकांनी बेदरकारपणे गाड्या चालवून अन्य पर्यटकांच्या जीवास धोका निर्माण होईल असे कृत्य केले. अनेक वेळा पर्यटकांवर कारवाई करुनही ही परिस्थिती कायम आहे. शिवाय समुद्रावर भरधाव गाड्या चालवून अपघातही झाले आहेत. याबाबत दापोली पोलिसांकडून कारवाईही करण्यात आली होती.www.konkantoday.com




