
खेड तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सुमारगडावरील शिडी तुटली; शिवभक्तांचा संपर्क तुटला
खेड तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि निसर्गरम्य परिसरात डौलाने उभा असलेल्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक सुमारगड किल्ल्यावर जाण्यासाठीची लोखंडी शिडी तुटल्याने गडावर जाण्याचा शिवभक्तांचा संपर्क तुटला. तुटलेल्या लोखंडी शिडीची दुरुस्ती करुन गडावर जाण्याचा मार्ग मोकळा करून शिवभक्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवभक्तांनी केली आहे.
सुमारगडावरील लोखंडी शिडी कोसळल्याची माहिती तत्काळ वाडीमालदे येथील शिवभक्तांनी प्रशासनाला कळवली आहे. परंतु आज आजपर्यंत प्रशासनाने वा शासनाने याची दखल घेतली नसल्याने शिवभक्तांनी नाराजीचे पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्रात सध्या शिवशाही सरकार आहे. गडकिल्ल्यांच्या विकासाच्या गप्पा मारल्या जात आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सुमारगड आज शासनाला मदतीची हाक मारूनही शासन व स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचे आरोप शिवभक्त करत आहेत.www.konkantoday.com




