शाळांच्या सहली व लग्नासाठी एसटी बसेसना मोठी मागणी,

रत्नागिरी विभागाला १ कोटी १ लाख रुपयांचे उत्पन्न
सध्या शाळा आणि महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहली आणि लग्नाचा हंगाम सुरू असल्यामुळे रत्नागिरी एस. टी. विभागातील बसेसना मोठी मागणी आहे. दि. १ डिसेंबर ते १६ डिसेंबर २०२५ दरम्यान शैक्षणिक सहलीसाठी ४७० आणि लग्न व इतर कार्यासाठी ५१ बसेस धावल्या. यामुळे विभागाला तब्बल १ कोटी १ लाख रुपये उत्पन्न मिळाले असून, जानेवारी महिन्यातही मोठ्या प्रमाणावर बुकिंग झाले आहे.
नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे तीन महिने शाळा-महाविद्यालयांच्या सहलीसाठी महत्त्वाचे असतात. यंदा सहलीसाठी एसटीच्या नवीन स्मार्ट बसेस वापरण्याचे आदेश देण्यात आले होते, ज्यामुळे प्रवाशांना *सुविधा मिळाली आणि चांगला प्रतिसाद मिळाला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button