
बियाणी बालमंदिरात गुरुवर्य रामचंद्र पुरुषोत्तम जोग यांच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रम
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळ संचलित प.पू. सौ. गोदावरीदेवी भ. बियाणी बालमंदिर विभागात गुरुवर्य रामचंद्र पुरुषोत्तम जोग यांच्या स्मृतीदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आवडीचे गीत, अभिनयगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
बालमंदिरच्या मुख्याध्यापिका धनश्री मुसळे यांनी प्रास्ताविक केले. १७० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत उत्तम सादरीकरण केले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या कृ. चिं. आगाशे विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका शीतल काळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. अशा उपक्रमातून बालकांचा भाषिक विकास व साहित्याची ओळख होतेच, पण याशिवाय अनेक गोष्टी कशाप्रकारे साध्य होतात ते त्यांनी आपल्या मनोगतातून पालकांना सांगितले. जोग सरांच्या आठवणी विद्यार्थ्यांना सांगितल्या. विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
शालेय समिती पदाधिकारी राजेंद्र कदम, सनातन रेडीज, पालक प्रतिनिधी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. संपदा भाटवडेकर यांनी केले.




