
फुणगूस–जाकादेवी मुख्य रस्त्यावरील तीव्र व अवघड वळणावर आयषर टेम्पो ला अपघात मोठी दुर्घटना टळली
फुणगूस–जाकादेवी मुख्य रस्त्यावरील तीव्र व अवघड वळणावर शनिवारी रात्री अपघात घडला. गोवा येथून मुंबईकडे प्लास्टिक पेपरची वाहतूक करणारा जी. जे. 03/बी वाय 5664 क्रमांकचा आयषर टेम्पो चालक मो. सिद्दीक मदाकीया हा गुगल मॅपने दर्शविलेल्या जवळच्या मार्गावरून जात असताना रस्त्याचा योग्य अंदाज न आल्याने थेट खोल दरीत पलटी होता होता बचावला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हा अपघात शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास झाला. अपघातग्रस्त टेम्पोमधील चालकास सुरक्षित बाहेर काढण्यात आले. अपघातामुळे टेम्पोचे व आतील मालाचे नुकसान झाले आहे
या संपूर्ण मार्गावर अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक, धोक्याच्या सूचना, वेगमर्यादा दर्शविणारी चिन्हे व रिफ्लेक्टरचा अभाव दिसून येतो. परिणामी चालकांना पुढील वळणाची तीव्रता किंवा रस्त्याची दिशा समजत नाही आणि अपघातांची मालिका सुरूच आहे.




