
रत्नागिरीत नगराध्यक्षपदाच्या महायुतीच्या उमेदवार शिल्पा सुर्वे मोठ्या मताधिक्याने विजयी
रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने जबरदस्त यश मिळवले आहे 32 जागांपैकी 29 जागांवर दणदणीत विजय मिळवत महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे यांनी देखील प्रचंड आघाडी घेत विजय मिळवला आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिल्पा सुर्वे व इतर महायुतीच्या उमेदवारांनी सारे श्रेय पालकमंत्री उदय सामंत व त्यांच्यावर विश्वास दाखवणाऱ्या मतदारांना दिले आहे
शिल्पा सुर्वे (शिवसेना)-20031
शिवानी सावंत ( उबाठा)-10716
प्राजक्ता किणी – (अपक्ष)-511
संध्या कोसुम्बकर-(अपक्ष)-506
वाहिदा मुतुर्झा (राष्ट्रवादी )-3019
सुश्मिता शिंदे (आप )-315




