
हर्णे समुद्रकिनारी परप्रांतातील फास्टरचा धुमाकूळ, मच्छिमारांच्यात चिंतेचे वातावरण
पुन्हा फास्टरचा धुमाकूळ हर्णेतील मच्छिमार चिंतेत गेले दोन महिने समाधानकारक मिळणारी मासळीची आवक सध्या अचानक घटली असून किनार्याजवळ मासेमारी करणार्या परप्रांतीय फास्टर नौका याला जबाबदार असल्याचे येथील मच्छीमारांचे म्हणणे आहे.
दापोली तालुक्यातील हर्णै बंदर ताज्या मासळीचे मोठे केंद्र आहे. ताज्या मासळीसाठी पर्यटक हर्णे बंदराला पूर्वीपासून भेट देत आहेत. त्यामुळे येथे गेल्या १० वर्षात पर्यटन फुलले आहे. येथील मच्छिमार बहुतांश कोळी समाजाचे असून चार आणि सहा सिलेंडरच्या रेग्युलर इंजिन वापरून चालणार्या नौकांनी मासेमारी करतात. मात्र कर्नाटक, केरळ मधील मच्छिमार जादा पॉवरच्या आधुनिक मशीन वापरून मासेमारी करत आहेत. या मशीन आणि नौकांची किंमत कोटीमध्ये असल्याचे सांगितले
जाते. या आधुनिक नौकांव्दारे या परप्रांतीय धनदांडग्यांनी गेली १० वर्षे आपल्या कार्यक्षेत्रातली मासळी संपवून टाकली आहे. त्यामुळे आता ते महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये मासळीसाठी येत आहेत. या नौका लोखंडी असून मोठ्या इंजिनमुळे स्पीड ही जादा आहे. त्यामुळे त्यांना फास्टर म्हटले जाते. याच फास्टर नौकानी पुन्हा हर्णै जवळ धुमाकुळ घातला असून गस्तीच्या वेळी अगदी किनार्यावर येवून मसेमारी करीत आहेत.www.konkantoday.com




